निरोगी राहण्यासाठी खा ही कडधान्य
धावपळीच्या आयुष्यामध्ये प्रत्येकाला रोजच व्यायाम करायला मिळेलच असं नाही.
मुंबई: धावपळीच्या आयुष्यामध्ये प्रत्येकाला रोजच व्यायाम करायला मिळेलच असं नाही. त्यामुळे आजारपणाच्या समस्याही मोठ्या प्रमाणावर वाढतात. पण हे आजारपण कमी करण्यासाठी मोड आलेली कडधान्य हा एक उपाय आहे.
मोड आलेल्या मुगामध्ये मोठ्या प्रमाणावर व्हिटॅमिन सी असतं. ज्यामुळे केसांची वाढ चांगली होते. तसंच रक्त शुद्ध व्हायला मदत होते. फळं आणि भाज्यांमध्ये मिळतं त्यापेक्षा 100 पट जास्त एंजाईम तुम्हाला मोड आलेले मूग किंवा चणे खाल्यामुळे मिळतं.
मोड आलेले मूग आणि चणे खाल्ल्यामुळे पचन संस्थाही चांगली होते. यामध्ये असलेल्या प्रोटीनमुळे शरीर चांगलं काम करतं. मोड आलेले मूग आणि चण्यांमुळे चेहऱ्यावरच्या सुरकुत्याही कमी होतात.
या कडधान्यांचे एवढे फायदे असले तरी अनेकांना ती नुसती खायला आवडत नाहीत. त्यामुळे त्याला सलाड बनवूनही तुम्ही खाऊ शकता. पण लक्षात ठेवा मोड आलेल्या या कडधान्यांना उकडलं किंवा तळलं तर त्यामधली पोषक तत्त्व निघून जातात. त्यामुळे ही कडधान्य उकडून सलाडसारखीच खा.
या कडधान्यांना तुम्ही टोमॅटो, कांदा आणि काकडीबरोबरही खाऊ शकता. तसंच त्यामध्ये गरजेनुसार मीठ आणि चाट मसाला टाकून तुम्ही त्याला आणखी चविष्ट बनवू शकता.