मुंबई: आपले केस सुंदर दिसावे असं प्रत्येक व्यक्तीला वाटतं.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

केस सुंदर दिसण्यासाठी बाजारातले शॅम्पू, हेअर क्रिम, हेअर ऑइल अशा कॅमिकलच्या वस्तूंचा आपण वापर आपण करतो. पण या वस्तूंच्या वापरामुळे केस गळण्यास सुरूवात होते.


केस गळती थाबंवण्यासाठी रोजच्या आहारात बदल करा, रोजचा आहार योग्य आणि लोहयुक्त असावा.


रोजच्या आहारात या ४ वस्तूंचा समावेश करा:


१. शिमला मिर्ची: शिमला मिर्चीमध्ये व्हिटॅमिनचे प्रमाण जास्त असते. त्यामुळे केस वाढण्यास मदत होते.


२. पालक: पालकच्या भाजीतील लोहामुळे केस मजबूत होतात  आणि चमकदार राहतात.


३. मसूर डाळ:  मसूरच्या डाळीत योग्य प्रोटीन असल्यामुळे केस गळती थांबण्यास मदत होते.


४. अंडी: अंड्यात विटामिनचं प्रमाण जास्त असल्याने अंडीचा वापर आहारात करा, तसेच अंड फेटून केसांना लावल्याने केस दाट आणि चमकदार होतात. 


केस गळती थाबंवण्यासाठी फळांचा आणि भाज्यांचा समावेश रोजच्या आहारात करावा.