नवी दिल्ली : गर्भधारणेपासून वाचण्यासाठी जास्तच जास्त महिला गर्भनिरोधक औषधांचा वापर करतात. (कॉन्ट्रासेप्टिव पिल्स)चा वापर करतात. ही पद्धत गर्भधारणेपासून वाचण्याची सर्वात प्रचलित पद्धत आहे. डॉक्टरांच्या मते ही पद्धत 99.7 टक्के काम करते. मात्र काही गोष्टीत सावधानता ठेवली नाही तर तुम्ही, कॉन्ट्रासेप्टिव घेतल्यानंतरही  अनवॉन्टेड प्रेग्नेंसीचे शिकार होऊ शकतात. मात्र प्रेग्नेंसीपासून वाचण्यासाठी ही पद्धत वापरू नये असं रिसर्चमधून समोर आलं आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

स्त्री रोगतज्ञ डॉक्टर नंदिता पालशेतकर आणि डॉ. वायएस नंदनवार यांच्यानुसार महिलांच्या तीन चुकांमुळे अनवॉन्टेड प्रेग्नेंसी त्यांना भोगावी लागते.


औषध घेण्यात अनियमितता


दोन गोळ्यांचं सेवन करताना २४ तासांपेक्षा जास्त अंतर नसावं. लक्षात ठेवा रोज तुम्हाला नियमित एक कॉन्ट्रासेप्टिव घ्यायची आहे. जर तुम्ही सकाळी ही गोळी घेतली, तर रोज सकाळीच कॉन्ट्रासेप्टिव घ्या. नाहीतर गोळ्यांचा असर नक्कीच कमी होईल.


औषध घेण्यात दोनपेक्षा जास्त वेळेस चूक


डॉ. नंदनवार यांच्यानुसार ३५ वर्षापासून मी करत असलेल्या डॉक्टरकीत सर्वात महत्वाची गोष्ट समोर आली आहे की, कॉन्ट्रासेप्टिव औषध घेण्यात अनियमितता ठेवल्यास नको असलेली गर्भधारणा होऊ शकते. सुरूवातीच्या दिवसांमध्ये गोळ्या घेताना एकही चूक केली, तरी गर्भधारणा होऊ शकते. 


कारण पहिला आठवडा प्रजननाची अंडी बनवण्यात सर्वात महत्वाचा असतो. जर कोणत्याही कारणास्तव तुम्ही पहिल्या दिवीश गोळी नाही घेऊ शकले, तर दुसऱ्या दिवशी दोन गोळ्या घ्या. जर तरीही तुम्ही सुरक्षित सेक्स करत नसाल, येथे सुरक्षित सेक्स याचा अर्थ गर्भधारणा न होण्यासाठी कंडोमने केलेला सेक्स असा आहे. जर सुरक्षित सेक्स केलेला नसेल, तर दोन पेक्षा जास्त दिवस गोळ्या न घेतल्याने गर्भधारणा होऊ शकते.


डायरीया अथवा उल्टी होत असेल तर


जर तुम्हाला डायरीया सारखं वाटत असेल किंवा उल्टी होत असेल, तर गोळी घेण्याच्या काही तासानंतर तुम्हाला उल्टी होते, असं असेल तर तुमची प्रेग्नेंट असण्याची शक्यता वाढते, कारण उल्टी आणि डायरीया सारखं झालं तर तुमच्या शरीरात गोळीचा अर्क थांबतच नाही.