ब्रेकफास्टमध्ये नेहमी खा दोन अंडी
संडे हो या मंडे रोज खाओ अंडे असे म्हटले जाते. अंड्यात केवळ पौष्टिक तत्वेच नसतात तर वजन कमी करण्यातही अंडी फायदेशीर ठरतात.
मुंबई : संडे हो या मंडे रोज खाओ अंडे असे म्हटले जाते. अंड्यात केवळ पौष्टिक तत्वेच नसतात तर वजन कमी करण्यातही अंडी फायदेशीर ठरतात. नुकत्याच करण्यात आलेल्या संशोधनानुसार रोज कमीत कमी दोन अंडी नाश्त्यात खाल्ल्यास अतिरिक्त वजन कमी कऱण्यास मदत होते. इतकेच नव्हे तर अंडी खाल्ल्याने शरीरात उर्जाही निर्माण होते.
अंडीमध्ये मोठ्या प्रमाणात पौष्टिक तत्वे आणि प्रोटीन्स असतात यामुळे इतर स्नॅक्सच्या तुलनेत पोट लवकर भरते. सकाळी नाश्यात अंडे खाल्ल्यास दुपारचे जेवण कमी कॅलरीज असलेले घेतले तरी चालते.
अंड्यातील सफेद भागात अॅल्ब्युमिन नावाचे प्रोटीन मोठ्या प्रमाणात असते. सकाळच्या वेळेस शरीराला या प्रोटीनची अधिक गरज असते. त्यामुळे सकाळच्या नाश्त्यात अंड्याचे सेवन केल्यास प्रोटीनची गरज भागली जाते. तसेच अंड्यात कोलाईन नावाचे तत्व असते ज्यामुळे स्मरणशक्ती सुधारण्यास मदत होते. त्यामुळेच लहान मुलांना नाश्त्यामध्ये अंडी देणे गरजेचे असते.