मुंबई :  हार्वर्ड विद्यापीठाने केलेल्या एका संशोधनानुसार कोल्ड ड्रिक्स, बाजारात मिळणारे बाटलीबंद ज्यूस आणि हेल्थ ड्रिंक्स आरोग्यासाठी अधिक अपायकारक असल्याचे आढळले आहे. ही पेये केवळ तुमच्या रक्तातील साखरच वाढवत नाहीत तर शरीरातील इन्सुलिनचे प्रमाण घटवून मधुमेहाचा तसेच हृदयरोगाचा धोका वाढवतात.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अमेरिकेच्या टफ्ट्स विद्यापीठातील संशोधकांच्या मते जगभरात दरवर्षी साधारण १.३३ लाख लोकांचा मृत्यू केवळ मधुमेहामुळे होतो; तर हृदयविकारामुळे ४५,००० लोक दगावतात आणि कर्करोगामुळे ६,५०० लोक बळी पडतात. याचाच अर्थ केवळ कोल्ड ड्रिंक्समुळे दरवर्षी १.८४ लाख लोकांचा मृत्यू होतो. 


भारतातही दरवर्षी दहा लाख लोकांचा मधुमेहामुळे मृत्यू होतो. जगभरातील सर्वाधिक मधुमेहाचे रुग्ण भारतात आहेत. दरवर्षी हे प्रमाण वाढत आहे. कोल्ड ड्रिंक्स, बाटलीबंद ज्यूस याचा धोका पुरुषांपेक्षा महिलांना जास्त असतो. जगभरात महिला मोठ्या प्रमाणात कोल्ड ड्रिंक्स घेतात. 'डायबिटीस केअर' नावाच्या एका संस्थेने केलेल्या तीन लाखांपेक्षा जास्त व्यक्तींचे निरीक्षण केले. 


सामान्य माणसाचे शरीर या कोल्ड ड्रिंक्समध्ये असलेली साखर पचवू शकत नाही. इतकी साखर पचवण्यासाठी मोठ्या प्रमाणात शारीरिक मेहनतीची गरज असते. हल्ली शारिरिक श्रम कमी झाल्याने कोल्ड ड्रिक्स पिणे शरीरासाठी अपायकारक ठरते.