दिवाळीचा फराळ न्यूजपेपरवर ठेवू नका, तर गंभीर आजाराचा धोका!
दिवाळीला काही दिवस बाकी आहेत. दिवाळीचा फराळ करण्यात अनेक जण मग्न असतील. मात्र, तुम्ही तळलेल्या पदार्थांमधील तेल टिपण्यासाठी न्यूजपेपरचा वापर कराल तर गंभीर आजाराचा धोका अधिक आहे.
मुंबई : दिवाळीला काही दिवस बाकी आहेत. दिवाळीचा फराळ करण्यात अनेक जण मग्न असतील. मात्र, तुम्ही तळलेल्या पदार्थांमधील तेल टिपण्यासाठी न्यूजपेपरचा वापर कराल तर गंभीर आजाराचा धोका अधिक आहे.
दिवाळीचे प्रमुख आकर्षण असते दिवाळी फराळाचे. घरात-घरात लाडू, चिवडा, चकली, करंजी, शंकर पाळ्या, अनारसे आदी अनेक पदार्थ केले जातात. अनेक पदार्थ तळलेले असतात. त्यामुळे तेल टिपण्यासाठी न्यूजपेपर पसरले जातात. मात्र, न्यूजपेपरसाठी जी शाही वापरतात ती आरोग्याला अत्यंत धोकादायक असते. यामुळे कॅन्सरचा धोका वाढतो.
हा धोका अधिक वाढतो?
- मासिके किंवा वर्तमानपत्रामधील शाई तेलकट पदार्थांमध्ये सहज शोषली जाते. शाईमधील ग्राफाईट हा घटक घातक असल्याने यामुळे कॅन्सरचा धोकाही असतो.
- शरीरातील विषारी घटक मूत्रविसर्जनातून किंवा शौचातून बाहेर पडतात परंतु ग्राफाईट शरीरात साचून राहतो. त्याचा परिणाम किडनी आणि फुफ्फुसांवर होतो.
- न्यूजपेपरमधील शाईतील सॉल्वंट्स पचनक्रियेत बिघाड करते. तसेच हार्मोन्सच्या पातळीमध्ये संतूलन बिघडविते. परिणामी कॅन्सरचा धोका वाढतो.
- पेपरपेक्षा मासिकाचा कागद तुम्हांला अधिक चांगला वाटत असल्यास हा तुमचा गैरसमज आहे. कागद अधिक ग्लॉसी बनवण्यासाठी तसेच शाई स्प्रेड होऊ नये म्हणून वापरले जाणारे घटक अधिक धोकादायक असतात.
- पदार्थांमधील अतिरिक्त तेल शोषून घेण्यासाठी टीश्यू पेपर किंवा पेपर टॉवेलचा वापर करा.
- टिश्यू पेपर किंवा टॉवेल घाऊक घेतल्यास फार महाग पडत नाहीत. मात्र तुम्हांला कागदाचाच वापर करायचा असल्यास किमान छपाई न केलेला कागद वापरा.