मुंबई : आरोग्यासाठी सर्वात चांगली भाजी कुठेची असेल ती शेवग्याच्या शेंगा. याला डांबे सुद्धा म्हटले जाते. तर इंग्रजीत ड्रमस्टिक असे नाव आहे. ही भाजी जेवणात रुची वाढतेच तर एवढेच नाही सेक्स पॉवर वाढविण्यासाठी मदत करते.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या  भाजीत अनेक सौंदर्यवर्धक गुण भरपूर आहेत. शेवग्याच्या शेंगा पुरुषांसाठीही लाभदायक आहे. शुक्राणुंची वृद्धी करण्यासाठी आणि वीर्य घट्ट करण्यासाठी मदत करते. तसेच महिलांना गर्भाशयच्या काही समस्या असतील त्या दूर होतात.


त्वचा संबंधीत जे काही आजार असतील तर ही भाजी खूप लाभदायक ठरते. त्वचा रोग दूर होण्यास मदत होते. या भाजीची पाने तसेच फुलांचा वापर केला तर मलेली त्वचा चांगली होते आणि सुंदर होण्यास मदत होते. त्वचा कोमल आणि मुलायम होते. यात सी व्हीटॅमिन अधिक असते. त्यामुळे तुमची रोग प्रतिकार शक्ती वाढण्यास मदत होते. अनेक आजार दूर होतात.


मूळव्याधीचा आजार असेल तर त्यावर आराम मिळतो. बद्धकोष्ठता समस्या होत नाही. सर्दी झाली असेल तर शेवग्याच्या शेंगा खल्ल्याने आराम पडतो. नाकाने पाणी गळत असेल तर थाबंते, कफ पातळ होण्यास मदत होते. त्यासाठी गरम पाण्यात उकळविले पाहिजे. तसेच गरोदर स्त्रियांनी खाणे चांगले. त्याचा लाभ हा होणाऱ्या बाळाला होतो.