तजेलदार त्वचेसाठी हे पाच पदार्थ टाळायलाच हवेत...
आजच्या या धकाधकीच्या जीवनात आपल्याला कोणालाही त्वचेची काळजी घेणे जमत नाही. मात्र कुणाला हेल्दी त्वचा नको असते? आपल्या चेहऱ्याची त्वचा ही सर्वात नाजूक असते. त्यामुळे तिची काळजी घेणे हे तितकेच गरजेचे आहे. प्रदूषणाचा सगळ्यात जास्त परिणाम हा आपल्या चेहऱ्यावर होतो. त्यामुळे फक्त क्रिम लावून नाही तर योग्य आहारदेखील केला पाहिजे. योग्य आहारामुळे कोरडी त्वचा किंवा चेहऱ्यावर पुरळ येत नाही.
मुंबई : आजच्या या धकाधकीच्या जीवनात आपल्याला कोणालाही त्वचेची काळजी घेणे जमत नाही. मात्र कुणाला हेल्दी त्वचा नको असते? आपल्या चेहऱ्याची त्वचा ही सर्वात नाजूक असते. त्यामुळे तिची काळजी घेणे हे तितकेच गरजेचे आहे. प्रदूषणाचा सगळ्यात जास्त परिणाम हा आपल्या चेहऱ्यावर होतो. त्यामुळे फक्त क्रिम लावून नाही तर योग्य आहारदेखील केला पाहिजे. योग्य आहारामुळे कोरडी त्वचा किंवा चेहऱ्यावर पुरळ येत नाही.
या पाच पदार्थांचे सेवन तुमच्या चेहऱ्याकरिता हानिकारक...
कॅन्डी
अतिप्रमाणात कॅन्डी खाणे हे तुमच्या चेहऱ्याकरिता चांगले नाही. कॅन्डीमध्ये साखरेचे प्रमाण जास्त आसते जे त्वचा निस्तेज करते आणि त्यामुळे सुरकुत्याही पडतात.
मीठ
जर तुम्हाला हेल्दी स्किन हवी असेल तर मीठ खाण्यावर कंट्रोल ठेवा. अतिप्रमाणात मीठ हे चेहऱ्याकरिता हानिकारक आहे. ज्यामुळे चेहऱ्याला हळूहळू सूज येते. मीठाने स्कीनचे टेक्शरदेखील खराब होते.
कॅफेन
चहा, कॉफी, कोक यांसारखे ड्रिंक्स तुमच्या आरोग्यासाठी चांगले नाहीत. या ड्रिंक्समुळे तुमची त्वचा लवकरच वृद्धांप्रमाणे दिसायला लागते. कॅफेनमुळे त्वचेतील पाण्याचे प्रमाणही कमी होते.
प्रक्रिया केलेले पदार्थ
जर तुम्हाला तुमच्या त्वचेची काळजी असेल तर प्रकिया केलेले पदार्थ खाणे तुम्ही टाळाच. या पदार्थांमध्ये मीठ आणि सोडिअमचे प्रमाण जास्त असते जे तुमच्या त्वचेकरिता चांगले नाही.
दूध
तुम्हाला आश्चर्य वाटेल की दूध हे हानिकारक कसे? दूध हा सगळ्यात पौष्टिक आहार असला तरी तो तुमच्या त्वचेकरिता चांगला नाही. दूधाच्या अतिरिक्त सेवनामुळे पुरळ येतात.
शेलफीश
कोळंबी मासा, खेकडा, लॉबस्टर खाणे टाळा... कारण यांत आयोडिनचं प्रमाण जास्त असतं... त्यामुळे चेहऱ्यावर पिंपल्स येऊ शकतात.