मुंबई : केळीच्या सालीचा तुम्हाला काय उपयोग होतो हे जर समजलं, तर तुम्ही केळीची साल लगेच फेकणार नाहीत. केळीची साल अनेक गोष्टीत कामात येते.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पिकलेल्या केळीची साल दातांना लावली तर दात पांढरे होतात, मात्र कच्ची केळी खाल्ले तर दात काही दिवस पिवळे राहतात.


तुम्हाला मच्छर, डास चावल्याच्या जागी पिकलेल्या केळीची साल लावली तर आग बंद होते. तसेच चावलेल्या जागी पिकलेल्या केळीची सालही घासतात.


तुमच्या हातावर काही व्रण असल्यास पिकलेल्या केळीची साल रात्रभर लावा.


पिंपल्स असतील तर पिंपल्सवर पिकलेली साल रगडा, त्याचाही फायदा होतो.


सोरायसीस सारखी लक्षणं दिसली तर केळीची पिकलेली साल लावा.


शूज क्लिन करण्यासाठीही केळीची साल लावतात.