तूप खाण्याचे आरोग्यवर्धक फायदे
आयुर्वेद असो वा आरोग्यशास्त्र दोन्हींमध्ये तुपाचे मोठे महत्त्व सांगितले आहे. जेवणातही तेलाचा वापर करण्याऐवजी तुपाचा वापर करण्याचा सल्ला दिला जातो. रोजच्या जेवणात तुपाचा वापर केल्यास आरोग्यासाठी खूप चांगले फायदे होतात.
मुंबई : आयुर्वेद असो वा आरोग्यशास्त्र दोन्हींमध्ये तुपाचे मोठे महत्त्व सांगितले आहे. जेवणातही तेलाचा वापर करण्याऐवजी तुपाचा वापर करण्याचा सल्ला दिला जातो. रोजच्या जेवणात तुपाचा वापर केल्यास आरोग्यासाठी खूप चांगले फायदे होतात.
जाणून घ्या तूप खाण्याचे आरोग्यवर्धक फायदे
पचनशक्ती सुधारते - तुपामध्ये ब्युटायरिक अॅसिड असल्याने पचनशक्ती सुधारण्यास मदत होते.
प्रतिकारक्षमता वाढते - तुपामध्ये मोठ्या प्रमाणात अँटी ऑक्सिडंट्स असतात. यामुळे इतर पदार्थांमधील व्हिटामिन्स तसेच मिनरल्स शरीरात शोषले जातात. यामुळे शरीराची प्रतिकारक्षमता वाढते.
बद्धकोष्ठतेचा त्रास असणाऱ्यांसाठी तूप उत्तम - बद्धकोष्ठतेचा त्रास असल्यास नियमित तूप घेणे आरोग्यासाठी चांगले.
तुपामध्ये व्हिटामिन ए, डी, ई आणि के असते जे शरीरासाठी फायदेशीर असतात. त्यामुळे हृद्य, मेंदू तसेच हाडे यांची कार्ये सुरळीत पार पडतात.