पालकचा ज्यूस पिण्याचे भरपूर फायदे
पालक भाजीत शारिरीक विकासासाठी गरजेच्या असलेल्या सर्व पोषक तत्वांचा समावेश असतो. मिनरल्स, व्हिटामिन्स तसेत अन्य पोषक तत्वांचा भरणा असतो. लोग पालकाची भाजी बनवून अथवा पालकाचे पराठे बनवून खातात. मात्र पालकाचा ज्यूस प्यायल्यानंतर शरीरास अधिक फायदे होतात.
मुंबई : पालक भाजीत शारिरीक विकासासाठी गरजेच्या असलेल्या सर्व पोषक तत्वांचा समावेश असतो. मिनरल्स, व्हिटामिन्स तसेत अन्य पोषक तत्वांचा भरणा असतो. लोग पालकाची भाजी बनवून अथवा पालकाचे पराठे बनवून खातात. मात्र पालकाचा ज्यूस प्यायल्यानंतर शरीरास अधिक फायदे होतात.
या कारणांमुळे पालकचा ज्यूस नियमित घ्यावा
पालकात व्हिटामिन केचे प्रमाण मोठ्या प्रमाणात असते. यामुळे पालकाचा ज्यूस प्यायल्याने हाडे मजबूत होतात.
पाचनक्रिया सुरळीत राखण्यासाठी पालकाचा ज्यूस पिण्याचा सल्ला दिला जातो. पालकामुळे शरीरातील अनावश्यक पदार्थ बाहेर फेकले जातात.
त्वचेशी संबंधित समस्या असल्यास पालकाचा ज्यूस पिणे फायदेशीर आहे. यामुळे त्वचेचा रंग उजळतो. तसेच केसांसाठीही पालकाचा ज्यूस उत्तम.
गर्भवती महिलांनाही पालकाचा ज्यूस पिण्याचा सल्ला दिला जातो. यामुळे गर्भवती महिलेच्या शरीरास लोहाची कमतरता निर्माण होत नाही.