आल्याचा चहा प्यायचे हे आहेत फायदे
सकाळी एक कप आल्याचा चहा आपल्याला फक्त फ्रेशच करत नाही तर अनेक आजारांशी लढायलाही मदत करतो.
मुंबई: सकाळी एक कप आल्याचा चहा आपल्याला फक्त फ्रेशच करत नाही तर अनेक आजारांशी लढायलाही मदत करतो. आल्याच्या चहाचे एँटी इन्फ्लेमटोरी, एँटी बॅक्टेरियल आणि एँटी ऑक्सिडेंट गुण तब्येतीसाठी चांगले असतात.
डोकेदुखीपासून सुटका
आल्याचा एँटी इन्फ्लेमटोरी गुण डोके दुखी आणि मायग्रेनपासून सुटका करायला मदत करतो. तसंच उलटीसारख्या लक्षणांवेळीही आराम मिळतो. त्यामुळे तुमचं डोकं दुखत असेल किंवा उलटी होत असेल तर आल्याचा चहा प्या.
सर्दी-खोकल्यावर उपाय
आल्याचा एँटी हिस्टामिन गुण हवाबदलामुळे झालेला सर्दी-खोकला आणि घसा दुखत असेल तर आराम देतो. त्यामुळे दिवसातून दोन वेळा आल्याचा चहा प्यायला तर सर्दी-खोकल्याचा त्रास कमी व्हायला मदत होते.
किडणीच्या आजारावर गुणकारी
आल्यामध्ये जिंजर ऑईल नावाचं बाष्पशिल तेल असतं, जे एँटीबायोटिकसारखं काम करतं. याचं एँटीमायक्रोबायल आणि एँटी इन्फ्लेमटोरी किडणीच्या इंन्फेक्शनवरील उपचारांसाठी मदत करतं. तुम्ही एक कप आल्याचा चहा औषधाबरोबर घेऊ शकता, पण त्याआधी एकदा डॉक्टरांचा सल्ला घ्या.
पित्ताचं प्रमाण होतं कमी
आल्यामध्ये असलेलं जिंजर ऑईल शरिरातील पित्ताचं प्रमाण कमी करतं. दिवसातून 2-3 वेळा आल्याचा चहा प्यायल्यानं पाळीवेळी होणारा त्रास कमी व्हायलाही मदत होते.