मुंबई: उन्हाळ्याला आता सुरुवात झाली आहे. या सिझनमध्ये चेहऱ्याची विशेष काळजी घेण्याची गरज असते. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

त्वचेची काळजी घेण्यासाठी तुमचं रोजचं जेवणही महत्त्वपूर्ण आहे. चांगल्या जेवणामुळे तुमच्या चेहऱ्यावर एक प्रकारचं तेज येतं. रोजच्या जेवणामध्ये ज्यूस, भरपूर पाणी आणि फायबर असलेल्या गोष्टी घेतल्यामुळे त्वचेहा पोषण मिळतं. 


तुमचा चेहरा तेलकट असेल तर दिवसातून किमान २ वेळा तरी चेहरा धुवत जा, त्यामुळे तुमच्या चेहऱ्यावर तेज येईल आणि त्वचेवर डाग पडण्याचं प्रमाणही कमी होईल. 


एकसारखा चेहरा धुतल्यानं फायदा होतो, असा अनेकांचा गैरसमज आहे. ज्यांचा चेहरा तेलकट आहे त्यांनी दिवसातून तीनपेक्षा जास्तवेळा चेहरा धुतल्यास नुकसान व्हायची शक्यता असते. 


सकाळी उठल्यावर दात घासल्यानंतर फेसवॉशनं चेहरा धुवा. त्यामुळे तुम्हाला फ्रेश वाटेल. 


दुपारच्या वेळी चेहरा धुताना गार पाण्याचा वापर करा. यामुळे चेहऱ्यावर आलेलं ऑईल निघून जायला मदत होईल. 


संध्याकाळी कामावरून परत आल्यावर चेहरा धुवायला विसरू नका. प्रवास करून आल्यामुळे चेहऱ्यावर मोठ्या प्रमाणावर धुळ साचते. त्यामुळे संध्याकाळी चेहरा धुताना हर्बल पॅकचा वापर करा. उन्हाळ्यामध्ये हर्बल पॅक वापरल्यानं त्वचेला आणखी फायदा होतो.


डागविरहित त्वचेसाठी करा हे सोपे उपाय


चेहरा साफ करण्यासाठी प्रत्येक वेळी फेस वॉशचा वापर करु नका. फेसवॉशमध्ये असलेली केमिकल्सचा परिणाम तुमच्या चेहऱ्याच्या कोमलतेवर होऊ शकतो. 


जर तुमची स्किन ऑईली असेल तर प्रत्येक वेळी फेस वॉश वापरण्याऐवजी टोनरचा उपयोग करा, किंवा फक्त पाण्यानंच चेहरा धुवा.


तुमचा चेहरा संवेदनशिल असेल तर कोमट पाण्यानं चेहरा धुवत जा. अशा चेहऱ्यासाठी बेबी सोपचा वापर केला तरीही फरक जाणवतो.