नवी दिल्ली : बाप होण्यापासून रोखणारं सुरक्षित इंजेक्शन तयार करण्याचा दावा अमेरिकन संशोधकांनी केलाय.  


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

संशोधकांच्या म्हणण्यानुसार, या इंजेक्शनमुळे पुरुषांचे शुक्राणू निष्क्रीय होतात. या इंजेक्शनचा प्रयोग जवळपास 270 पुरुषांवर करण्यात आलाय. त्यानंतर 96 टक्के हे इंजेक्शन नको असलेलं मूल होण्याचा धोका टाळत असल्याचं निदर्शनास आलंय. 


परंतु, पुरुषांनी हे इंजेक्शन वापरल्यानंतरही महिलांना गर्भ राहिल्याच्या केवळ चार घटना समोर आल्यात. इंजेक्शन वापरल्यानंतर काहींना साइड इफेक्टही दिसले. परंतु, अशा घटना फारच विरळ होत्या. इंजेक्शननंतर पिंपल्स येणं आणि मूड खराब होणं, असे साईड इफेक्ट पाहायला मिळाले. 


संशोधक जवळपास 20 वर्षांपासून पुरुषांसाठी एखादी उपयोगी असं हार्मोन गर्भनिरोधक तयार करण्याच्या प्रयत्नात आहेत... ज्याचे साईड इफेक्ट दिसणार नाहीत. हे अध्ययन 'क्लिनिकल एंडोक्रिनोलॉजी अॅन्ड मेटाबॉलिज्म' नावाच्या मासिकात प्रकाशित झालंय.