मुंबई: तुम्हाला जास्त वेळ झोपायची सवय असेल तर आत्ताच हे प्रमाण कमी करा, कारण नऊ तासांपेक्षा जास्तची झोप तुमचं आयुष्य कमी करू शकते. नऊ तासांपेक्षा कमी झोपणाऱ्यांचं आयुष्य हे नऊ तासांपेक्षा जास्त झोपणाऱ्यांच्या आयुष्यापेक्षा जास्त असतं, असं एका सर्वेक्षणामध्ये समोर आलं आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

जे लोक रात्री जास्त वेळ झोपतात आणि दिवसभर शारिरिक कष्टाचं काम करतात, त्यांचं आयुष्य कमी असतं, असंही या सर्वेक्षणात सांगण्यात आलं आहे. तसंच 7 तासांपेक्षा काहीही काम न करता नुसतं बसून राहिलेल्या व्यक्तीही कमी जगतात असा दावा करण्यात आला आहे. 


हा धोका टाळण्यासाठी शारिरिक श्रम आणि व्यायाम करण्याचा सल्लाही या सर्व्हेक्षण करणाऱ्यांनी दिला आहे. तसंच या सवयी तंबाखू आणि दारूच्या व्यसनांइतक्याच गंभीर असल्याचं त्यांनी सांगितलं आहे. 


7 ते 8 तासांची झोप आणि व्यायामामुळे डायबिटीस हृदयरोग व्हायचा खतराही कमी होतो, असं या सर्वेक्षणात सांगण्यात आलं आहे.