मुंबई : पुरुषांमध्ये सध्या दाढी-मिशी ठेवण्याचा ट्रेंड आहे. मात्र अनेकांना इच्छा असूनही हा ट्रेंड फॉलो करता येत नाही. याचे कारण दाढी-मिशीची योग्य पद्धतीने वाढ होत नाही. दाढी न वाढण्याचे कारण हार्मोन बॅलन्स बिघडणे, स्मोकिंग असू शकतात. मात्र आयुर्वेदात असे काही उपचार आहेत ज्यामुळे दाढी वाढवण्यास तुम्हाला मदत करु शकतात.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

चेहऱ्याला नियमितपणे १०-१५ मिनिटे आवळ्याच्या तेलाने मसाज करा. यामुळे त्वचा मुलायम होईलच तसेच दाढी वाढेल.


रोज रात्री कच्चे दूध दाढीवर लावून झोपा. यामुळे केसांची वाढ होईल.


नारळाच्या तेलात ५-६ कढिपत्त्याची पाने टाकून ते गरम करा. त्यानंतर या तेलाने दाढीला मसाज करा. १० मिनिटांनी चेहरा धुवा. 


नियमितपणे गाजराता ज्यूस घ्या अथवा डाएटमध्ये गाजराचा समावेश करा.


थोडीशी काळी मिरी पावडर, मध आणि लिंबूचे मिश्रण करुन चेहऱ्यावर लावा. ५ मिनिटांनी चेहरा पाण्याने धुवा.