वॉशिंग्टन : अमेरिकेतील रोहड आयलँडविषयी एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. हे बेट म्हणजे एचआयव्ही बाधित लोकांचा बालेकिल्ला झाला आहे. येथील ६० टक्के पुरुषांना या एचआयव्हीची लागण झालीये. विशेष म्हणजे या सर्वांनी आपले सेक्स पार्टनर हे इंटरनेटवर शोधले होते.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

इथल्या सरकारी वैद्यकीय संस्थेने केलेल्या संशोधनात एचआयव्हीपीडित लोकांना सामाविष्ट केले होते. त्यांच्याकडून मिळालेल्या माहितीनुसार त्यांना या रोगाची बाधा होण्यात ऑनलाईन डेटिंग साईट्स मोठ्या प्रमाणावर जबाबदार असल्याचे पुढे आले आहे.


ऑनलाईन ओळखीनंतर या व्यक्ती जेव्हा प्रत्यक्षात पहिल्यांदा सेक्स करण्यासाठी एकमेकांना पहिल्यांदा भेटल्या तेव्हाच त्यांना एचआयव्हीचे संक्रमण झाल्याचे समजले आहे. यातील बहुतेकांना तर याची लागण झाल्याचेही माहीत नव्हते. 


तज्ज्ञांच्या मते ऑनलाईन डेटिंग साइट्सनी याविषयी जागरुकता पसरवणे गरजेचे आहे. यातून उद्भवू शकणाऱ्या धोक्यांविषयी लोकांना माहिती देणे गरजेचे आहे. तसेच ऑनलाईन पार्टनरसोबत शारीरिक संबंध प्रस्थापित करण्यापूर्वी दोघांनीही एचआयव्हीची तपासणी करुन घेणे आवश्यक आहे.