मुंबई : फीट राहण्याकरिता लोक डायटिंग आणि एक्झरसाईज करता पण तरीही वजन कमी होत नाही. असे तुमच्या बाबतीतही होत आहे का? शरीरातील चरबीचे प्रमाण वाढल्याने ह्रदयाचे विकार, मधुमेह, रक्तदाब, कोलेस्ट्रॉल, श्वसनाचे विकार यांसारखे आजार होऊ शकतात.

COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या कारणांमुळे तुमच्या शरीरातील चरबी कमी होत नाही
 
नाश्ता न करणे
सकाळचा नाश्ता हा संपूर्ण दिवसातील महत्त्वाचा आहार असतो. सकाळचा नाश्ता न करण्यामुळे तुमचे  पचनाची क्रिया मंद होते आणि त्यामुळे शरीरातील कॅलरीज बर्न होत नाही.

सोडा
सोड्यामध्ये साखरेचे प्रमाण अधिक असते. जे तुमचे डाएट बिघडवते. सोडामुळे तुमची खाण्याची इच्छा वाढते ज्यामुळे शरीराला गरज नसतानाही तुम्ही अधिक खाता.

ड्रिंक्स
दारूमुळे तुमचे पोट सुटते आणि त्याचबरोबर तुमची भूकही वाढते.

उशिरा जेवण
उशिरा जेवल्याने आणि त्यानंतर लगेचच झोपल्याने तुमचे शरीर फॅट्सचे रूपांतर एनर्जीमध्ये करू शकत नाही. त्यामुळे जेवण हे योग्य वेळेत आणि झोपण्याच्या किमान २-३ तास आधी झाले पाहिजे.

झोप पूर्ण नसेल
झोप पूर्ण न झाल्याने शरीरात घ्रेलीन या हार्मोनचे प्रमाण वाढते ज्यामुळे भूक वाढते.

तणाव
जेव्हा तुम्हाला तणाव जास्त असतो, तेव्हा तुमच्या शरीरात 'फाईट-ओर-फ्लाईट' या नावाचे हार्मोन तयार होते. जे तुमच्या शरीरातील फॅट्स वाढवतात.