COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मुंबई : पाया सूप हा प्रकार तुम्ही ऐकला आहे का? यात सरदार पाया सूपचं नाव आघाडीने घेतलं जातं. पाया सूप हे शेळी किंवा बोकडाच्या पायाच्या हाडापासून बनवलेलं असतं. पायाची ही हाडं गरम पाण्यात उकळली जातात, त्या सूपला पाया सूप म्हणतात.


व्हिडीओत दाखवण्यात आलेल्या ठिकाणचं सूप सर्वात चांगलं पाया सूप मानलं जातं...


हाडांमध्ये जिलेटीनचा अंश मोठ्या प्रमाणात असतं, पोटाच्या समस्या दूर करण्यासाठी जिलेटीन महत्वाचं मानलं जातं. पाया सूप सेवन केल्याने फूड अॅलर्जीपासून मुक्तता मिळते असं म्हटलं जातं. एवढंच नाही पाया सूप अॅसिडीटी, पोटाचे आजार, पोटाचा अल्सर या आजारावर रामबाण मानलं जातं.


पाया सूपमध्ये कॅल्शियम, मॅग्नेशियम, फॉस्फोरसचं प्रमाण मोठ्या प्रमाणात आहे, यामुळे हाडं मजबूत होण्यास मदत होते. कॅल्शियमची कमतरता असेल, तर पाया सूपचं सेवन करणे फायद्याचे असते.


बोन सूपमधील अॅमिनो अॅसिड मेंदूला मोठ्या प्रमाणात चालना देतो, शिवाय डोकं शांत ठेवण्यासही मोठी मदत होते.