मुंबई : मुलं फक्त मुलींच्या दिसण्यावर किंवा हॉटनेस आणि फिटनेसवर फिदा होत नाही, तर मुलींकडे अशाही काही अदा आहेत ज्या मुलांना प्रभावित करतात आणि खरं तर मुलींना हे पण माहीत नसेल, की त्यांच्या कोणत्या अदांवर मुलं फिदा आहेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कोणत्या बरं त्या अदा असतील...


केस मोकळे सोडणं


असं म्हटलं जातं की, मुलांना लांब केस असणाऱ्या आणि मोकळे केस ठेवणाऱ्या मुली खूप आवडतात. मग हळूच त्या केसांची बट चेहऱ्यावर आली की मुलांना ती मुलगी अजून आकर्षित करते... काही अशा अदांवर मुलं फिदा होतात.


मजेशीर अंदाज


मुलींच्या दिसण्यापेक्षा काही मुलांना मस्ती करणाऱ्या आणि विनोदी अर्थाने बोलणाऱ्या मुलीदेखील खूप आवडतात. म्हणजेच थट्टेने बोलणे, स्वत:च्या बोलण्यावर स्वत:च हसणे आणि मस्ती करता-करता कोणाचं मन दुखावलं जाऊ नये, याचीसुद्धा काळजी घेणाऱ्या मुलींवर मुलं फिदा असतात.


धडाकेबाज मुली


स्वत:चं स्टेटस बनवणारी, आपल्या पद्धतीने स्वत:चं जीवन जगणारी, लोक काय म्हणतील याचा विचार न करणारी, जिद्दीने वागून दुसऱ्या मुलींच्या पुढे जाणारी आणि आत्मविश्वास असणाऱ्या मुलीदेखील मुलांना आवडतात.


हुशार आणि इंटेलिजेंट मुली


हुशार मुली कोणाला नाही आवडत... ज्या मुली सासु-सुनांच्या मालिकेव्यतिरिक्त खेळ, राजकारणबद्दल स्वत:च मत मांडणाऱ्या मुलीही मुलांना आवडतात. स्मार्ट सेन्स ऑफ ह्युमर बरोबर अव्वल बुद्धीमत्ता असणाऱ्या मुलींवरदेखील मुलं फिदा असतात.


स्वछंद विचार


कोणावरही अवलंबून नसणाऱ्या किंवा स्वत:च्या पायावर उभ्या असणाऱ्या अशा मुली मुलांना आवडतात. तसेच स्वतंत्र विचार, योग्य मार्गाने आपलं जीवन जगणाऱ्या मुलींवरदेखील मुलं फिदा असतात.


सुंदर हसणं


नेहमीचं मुलांना मेकअप आणि जास्त किंमतीतले चांगले कपडे घालणाऱ्या मुली आवडतात असं नाही, तर काही वेळा केवळ गोड हसणाऱ्या मुलींवरदेखील मुलं जीव ओवाळून टाकतात.


जिद्दी आणि साहसी


आपल्या पद्धतीने बिनधास्त जीवन जगणाऱ्या किंवा एखादी गोष्ट हवी आहे त्या गोष्टीचा वेड्यासारखा पाठलाग करणाऱ्या अशा मुलींच्या प्रेमात मुलं वेडी होतात.