मुंबई: उन्हाळ्यामध्ये त्वचा काळी व्हायच्या समस्येनं अनेकांना ग्रासलेलं आहे. पण काही घरगुती उपाय करून तुम्ही त्वचेचं काळेपण घालवू शकता. 


काकडी, गुलाब पाणी आणि लिंबाचा रस


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

काकडी आणि लिंबामुळे त्वचेचा काळेपणा कमी व्हायला मदत होते. लिंबू त्वचेतला काळेपणा कमी करतं, तर काकडी आणि गुलाब पाण्यामुळे त्वचेला थंडावा मिळतो. हे तिन्ही पदार्थ त्वचेला लावा आणि 10 मिनीटांनंतर थंड पाण्यानी चेहरा धुवा. 


पपई आणि मधाचं फेसपॅक


पपईमध्ये असलेल्या एंजाईम्समुळे चेहऱ्याचा काळेपणा दूर व्हायला मदत होते. पपईमधले एंजाईम्स त्वचेवरचे डाग कमी करतात. तर मध त्वचेला मुलायम बनवते. अर्धा कप पिकलेली पपई कुसकरुन त्यात एक चमचा मध टाका, हे मिश्रण त्वचेला लावा आणि पाण्यानं चेहरा धुवा. 


टोमॅटो, दही आणि लिंबू रस


लिंबू त्वचेवर असलेले डाग कमी करतं, तर टोमॅटोचा रस त्वचेवर असलेली छिद्र कमी करतो, त्वचेचा तेलकटपणाही टोमॅटोच्या रसानं कमी होतो. दह्यामुळे त्वचेला पोषण मिळतं. 


तीन मोठे चमचे टोमॅटोचं मिश्रण, एक मोठा चमचा लिंबू रस आणि एक मोठा चमचा दही घ्या. हे तिन्ही पदार्थ एकत्र करून त्वचेला लावा. अर्धा तास चेहऱ्यावर हे मिश्रण तसंच ठेवा, आणि वाळल्यानंतर पाण्यानं चेहरा धुवा. 


चंदन पावडर आणि नारळ पाणी


चंदन पावडर त्वचा साफ करतं, तसंच चेहऱ्यावर असलेली घाण, डागही यामुळे कमी होतात. एक मोठा चमचा चंदन पावडर नारळ पाण्यामध्ये टाका, यामध्ये बदाम तेलाचे थोडे थेंब टाका आणि चेहऱ्यावर लावा. 20 मिनीटांनंतर चेहरा धुवून घ्या.