मुंबई : वजन कमी करण्यासाठी तुम्ही जिममध्ये जाणं, आपले आवडते पदार्थ दूर सारणं अशा अनेक गोष्टींचा प्रयोग स्वत:वर करत असाल... पण, तरीही वजन कमी होत नाही, अशी तुमची तक्रार असेल तर सावधान... 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

यासाठी कारणीभूत असतो तो तुमचा निष्काळजीपणा... काय आहेत काळजी घेऊनही वजन वाढण्याची कारणं... 


प्रोटीन कमी प्रमाण


प्रोटीन ही शरीरासाठी अतिशय महत्त्वाची गोष्ट आहे. वजन कमी करण्याच्या नादात अनेकदा प्रोटीन्सही आहारातून कमी होतात. यासाठी, तुमचा सकाळचा नाश्ता प्रोटीन्सपूर्ण असेल याची काळजी घ्या.


पाणी कमी पिणं


अनेक प्रयत्न करूनही तुमचं वजन कमी होत नसेल तर यामागचं कारणं कदाचित तुमची पाणी पिण्याची सवय असू शकेल. दिवसभरात तुम्ही भरपूर पाणी प्यायल्याची खात्री करून घ्या... वजन कमी करण्यासाठी पानी महत्त्वाची भूमिका पार पाडतं. खाण्यापूर्वी थोडं पाणी प्यायल्यानं तुम्ही प्रमाणापेक्षा जास्त खाण्यापासून स्वत:ला वाचवता.


रिकाम्या पोटी व्यायाम


काहीही न खाता-पिता तुम्ही व्यायाम करत असाल तर तुम्ही तुमच्या शरीराची झीज करताय, हे लक्षात घ्या. रिकाम्या पोटी व्यायाम केल्याचे अनेक दुष्परिणाम होऊ शकतात. यामुळे, वजन तर कमी होत नाही पण तुमचं मांस मात्र कमी होतं.


पुरेशी झोप


कामाच्या, कुटुंबाच्या व्यापामुळे तुम्ही तुमच्या झोपेकडे दुर्लक्ष करत असाल तर हेदेखील तुमचं वजन वाढण्यामागे एक कारण ठरू शकतं... 


हिरव्या भाज्या आणि फळं


अनेकदा डाएटनुसार जेवण घेण्याच्या नादात तुम्ही फळं आणि हिरव्या भाज्याचं खाणं विसरून जाता. यामुळे, तुमच्या शरीराचं पोषण कमी होतं... मात्र, तुमचं वजन जैसे थेच राहतं.


बेहिशोबी खाणं


आपण व्यायाम करतोय त्यामुळे कितीही खाल्लं तरी काही फरक पडत नाही, असा अनेकांचा गैरसमज असतो... पणं, व्यायामासोबत तुमच्या जेवणाकडेही लक्ष देणं आवश्यक असतं.