सकाळी-सकाळी या सात गोष्टी टाळल्या तर फायदा तुमचाच...
सकाळी उठून तुम्ही काय करायला हवं याविषयी एव्हाना बऱ्याचदा तुम्ही ऐकलं असेलच... पण, सकाळी-सकाळी उठल्यानंतर कोणत्या गोष्टी करू नयेत, हे तुम्हाला ठाऊक आहे का?
मुंबई : सकाळी उठून तुम्ही काय करायला हवं याविषयी एव्हाना बऱ्याचदा तुम्ही ऐकलं असेलच... पण, सकाळी-सकाळी उठल्यानंतर कोणत्या गोष्टी करू नयेत, हे तुम्हाला ठाऊक आहे का?
तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, आपल्या दिवसाची सुरुवात आपलं दिवसभरातल्या स्वास्थ्याला प्रभावित करते. जर तुमच्या दिवसाची सुरुवात चांगली झाली तर तुमचा उत्साह दिवसभरदेखील टिकून राहू शकतो. परंतु, तुमच्या काही सवयी तुमचा दिवस वाईटही ठरवू शकतो... तसंच यामुळे तुम्ही आजारीही पडण्याची शक्यता असते.
धुम्रपान करणं
धुम्रपान करणं टाळा, असं सांगूनही तुम्हाला याची सवय असेल तर तुम्ही दिवसभारत इतर वेळात एखाद्या वेळेस करा पण सकाळी उठल्या उठल्या मात्र कधीही धुम्रपान करू नका. यामुळे, कॅन्सरचा धोका अधिक वाढतो.
दारु पिणं
सकाळीच उठून तुम्ही दारु प्यायला बसलात तर तुमचा संपूर्ण दिवस कसा जाईल, हे तुम्हाला वेगळं सांगायला नको...
मसालेदार पदार्थ टाळा
सकाळच्या वेळेस न्याहारीमध्ये मसालेदार पदार्थ खाणं टाळा... सकाळच्या वेळी जेवढं हलकं आणि पौष्टीक अन्न तुम्ही घ्याल... तेवढा तुमचा दिवस चांगला जाईल.
कॉफी पिणं
सकाळ उठल्यानंतर कॉफी पिण्याची सवय असणाऱ्यांनो सावधान.. कारण, कॉ़फीमुळे तुमच्या शरीरात कॉर्टिसोलचं प्रमाण वाढते. हे तुमच्यासाठी अपायकारक ठरू शकतं. पण, कामाची सुरुवात केल्यानंतर मात्र तुम्ही कॉ़फी घेऊ शकता.
भांडणं करणं
जेवढं तुमचं शारीरिक स्वास्थ्य महत्त्वाचं आहे तेवढचं मानसिक स्वास्थ्यही महत्त्वाचं आहे. सकाळ सकाळ उठल्यानंतर तुम्ही भांडणं केलं तर दिवसभर तुमचा मूड खराब राहण्याची शक्यता असते... त्यामुळे तुम्ही कोणतंही काम मन लावून करू शकणार नाही.
भडकावू गोष्टी पाहणं
सकाळी उठून टीव्हीसमोर बसण्याची तुमची सवय असेल तर अशा गोष्टी पाहा ज्यामुळे तुम्हाला आनंद मिळेल... शांती मिळेल... सकाळीच न्यूज चॅनल आणि मारहाणीचे व्हिडिओ पाहत बसू नका.
लोळत पडणं
जाग आलीय... तरी सकाळी उठणं आवडत नाही म्हणून बेडवर नुसतं लोळत पडू नका... यामुळे, तुमची झोप पूर्ण झाली असेल तरीही तुम्हाला फ्रेश वाटणार नाही.