मुंबई :  आपण सगळेच आयुष्यात कधी ना कधी रडतो. रडणे ही कोणत्याही गोष्टीवरील नैसर्गिक प्रतिक्रिया आहे. महिला या पुरूषांपेक्षा जास्त रडतात, असे म्हटले जाते. मात्र रडणे हे कमकुवतपणाचे लक्षण नाही. त्याउलट रडल्याने माणसाचे मन हलके होते.
रडण्याचे काही फायदे पण आहेत. रडल्याने तुमचे डोळे स्वच्छ होतात आणि शरीरातील काही विषारी द्रव्ये अश्रूमार्फत बाहेर पडतात.

COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

रडण्याची ही काही कारणे

१. एकटेपणा किंवा प्रियकरांपासून दुरावा. एकटेपणा हे रडण्याचे सगळ्यात कॉमन कारण आहे.
२. जवळच्या व्यक्तींपासून दुरावा किंवा जवळच्या व्यक्तीचे निधन. यामुळे कोणाही व्यक्तीला भावनिक धक्का बसतो.
३. जेव्हा आपण प्रेमात पडतो किंवा ब्रेक अप होते अशावेळी खूप जास्त रडायला येते. रडणे हा एक सिग्नल असतो आपल्या भावना दुसऱ्यांपर्यंत पोहोचवायला.
४. जेव्हा आपण घाबरतो, दुखावतो अशावेळी लोक खूप रडतात. त्याचप्रमाणे काही लोकांना खूप आनंद झाल्यावरही रडायला येते ज्याला आपण आनंदाअश्रू म्हणतो.
५. रडणे हे एक दुखी: झाल्याचे लक्षण आहे जे आश्चर्य, सहानुभूती, चिडचिडेपणा यांसारख्या कारणांमुळे येते.