भारतात २६,००,००,००० लोक मानसिक आजाराशी भिडतायत!
दरवर्षी ७ एप्रिलला जागतिक आरोग्य दिन साजरा केला जातो. सहा दशकांपासून जागतिक आरोग्य संघटनेकडून हा दिवस `जागतिक आरोग्य दिन` म्हणून साजरा केला जातो. आजच्या जागतिक आरोग्य दिनाच्या निमित्तानं वाढता मानसिक ताणतणाव किती घातक बनत चालला आहे, यावर प्रकाश टाकणारा हा स्पेशल रिपोर्ट
मुंबई : दरवर्षी ७ एप्रिलला जागतिक आरोग्य दिन साजरा केला जातो. सहा दशकांपासून जागतिक आरोग्य संघटनेकडून हा दिवस 'जागतिक आरोग्य दिन' म्हणून साजरा केला जातो. आजच्या जागतिक आरोग्य दिनाच्या निमित्तानं वाढता मानसिक ताणतणाव किती घातक बनत चालला आहे, यावर प्रकाश टाकणारा हा स्पेशल रिपोर्ट
कामावर जाण्याची धावपळ... लोकल पकडण्याची घाई... बसमध्ये शिरण्याची धडपड... रिक्षात चढण्याची घाई... प्रत्येक क्षणी तणाव... रोजच्या जगण्याचा भागच बनलाय तणाव...
रोजच्या धावपळीमुळे आज प्रत्येकाच्या जीवनात ताण-तणाव वाढत आहे. खरं तर आज शहरी भागात प्रत्येक जण मानसिक तणावाखाली जगत असून तो जणू जीवनाचा एक भाग बनला आहे. भारतात प्रत्येक पाच व्यक्तीपैंकी एक जण मानसिक ताण-तणावाचा शिकार आहे. भारताच्या लोकसंखेचा विचार करता देशातील २० टक्के लोक आज तणावाखाली जगत आहेत. त्यातूनच आत्महत्येसारखं पाऊल उचललं जातं.
कार्पोरेट जगातलं भयानक वास्तव...
देशाच्या कॉर्पोरेट जगतातील परिस्थिती आणखीच भयंकर आहे. कामाच्या व्यापामुळे तणाव वाढत असून कॉर्पोरेट जगतात काम करणाऱ्या ५० टक्के व्यक्ती दिर्घकाळ मानसिक तणावाखाली जगत असल्याचं सरकारच्या आकडेवारीतून उघड झालंय. ३० टक्के लोक हे व्यसनाच्या आहारी गेले आहेत तर २० टक्के लोकांना खिन्नतेचे शिकार ठरले आहेत.
काय सांगते जागतिक आकडेवारी
भारतात २६,००,००,००० लोक मानसिक आजाराचा सामना करत आहेत. जगातल्या आनंदी देशांच्या यादीत भारत १११ क्रमांकावर आहे. विशेष म्हणजे, पाकिस्तान आणि बांग्लादेश या क्रमवारीत भारताच्या पुढे आहेत. जागतिक आरोग्य संघटनेच्या अहवालानुसार मानसिक तणावाच्या बाबतीत भारत हा पहिल्या १५ देशांच्या यादीत आहे.
वाढतं शहरीकरण, बदलेलेली जीवनशैली, अपुरी झोप, खानपाणाच्या बदललेल्या सवयी या सगळ्यांचा शरिरावर प्रतिकूल परिणाम होत असून मानसिक आरोग्य बिघडण्यास या बाबी कराणीभूत आहेत.ही सगळी पार्श्वभूमी पहाता आरोग्याविषयी अधिक जागृत होण्याची आवश्यकता आहे.