नवी दिल्ली : देशाच्या प्रगतीचं दर्शन घडवणा-या भारत पर्व या प्रदर्शनाला नवी दिल्लीत सुरुवात झालीय.. 17 राज्यांनी या प्रदर्शनात सहभाग घेतलाय. केंद्रीय पर्यटन मंत्रालयानं आयोजित केलेले हे प्रदर्शन 18 ऑगस्टपर्यंत सुरु राहणार आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

विविध हस्तकला, खाद्य पदार्थ आणि विविध क्षेत्रातील प्रगती दर्शविणारी राज्यांची दालने या ठिकाणी आहेत. महाराष्ट्राची तीन दालनं या प्रदर्शनात आहेत. महाराष्ट्राने या प्रदर्शनात आपल्या जडणघडणीचं दर्शन घडवलंय.


मेक इन महाराष्ट्राच्या माध्यमातून राज्यात झालेली गुंतवणूक आणि विकास डिजीटल पॅनलच्या माध्यमातून दाखवण्यात आलंय.. तसंच महाराष्ट्रातील थोर पुरुष आणि समाजसुधारकांचं योगदानही या प्रदर्शनात पाहायला मिळतंय. महाराष्ट्रातील लज्जतदार आणि मराठमोळ्या पदार्थांचा आस्वादही इथं घ्यायला मिळणार आहे.