सर्जिकल स्ट्राईक करणाऱ्या जवानांचा शौर्य पुरस्कारानं सन्मान
भारताने गेल्यावर्षी सप्टेंबर महिन्यात पाकव्याप्त काश्मीरात केलेल्या सर्जिकल स्ट्राईक मोहिमेतील 19 जवानांना शौर्य पुरस्कारांनी सन्मानित करण्यात येणार आहे. यातील काही अधिका-यांना प्रतिष्ठेच्या कीर्तीचक्र पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार असून कमांडिंग ऑफिसर्सच्या युद्ध सेवा पदकाने गौरवण्यात येणार आहे. यात 4 पॅराचे मेजर रोहित सुरी यांना कीर्तीचक्र, गोरखा रायफलचे हवालदार प्रेम बहादूर रेश्मी मगर यांना मरणोत्तर कीर्तीचक्र प्रदान करण्यात येणार आहे.
नवी दिल्ली : भारताने गेल्यावर्षी सप्टेंबर महिन्यात पाकव्याप्त काश्मीरात केलेल्या सर्जिकल स्ट्राईक मोहिमेतील 19 जवानांना शौर्य पुरस्कारांनी सन्मानित करण्यात येणार आहे. यातील काही अधिका-यांना प्रतिष्ठेच्या कीर्तीचक्र पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार असून कमांडिंग ऑफिसर्सच्या युद्ध सेवा पदकाने गौरवण्यात येणार आहे. यात 4 पॅराचे मेजर रोहित सुरी यांना कीर्तीचक्र, गोरखा रायफलचे हवालदार प्रेम बहादूर रेश्मी मगर यांना मरणोत्तर कीर्तीचक्र प्रदान करण्यात येणार आहे.
9 पॅराचे कमांडिंग ऑफिसर कर्नल कपिल यादव आणि 4 पॅराचे कमांडिंग ऑफिसर कर्नल हरप्रीत संधू यांचा युद्ध सेवा पदकाने गौरव करण्यात येणार आहे.. दोन पॅरा दलातील पाच जवानांना शौर्यचक्र बहाल करण्यात येणार आहे.. लेफ्ट. कर्नल रणजित सिंग पवार, मेजर कृष्णन मनोज कुमार, मेजर अमित देसवाल, नाईक रण सिंग, नाईक विजयकुमार एस, शिपाई राम चंदर, शिपाई सत्यप्रकाश सिंग,शिपाई सतीश, अजय सिंग यांना सेना पदक प्रदान करुन सन्मानीत करण्यात येणार आहे.