नेत्याच्या गाडीला ओव्हरटेक केल्यानं हत्या
बिहारमध्ये पुन्हा एकदा जंगल राजचा नमुना पाहायला मिळाला आहे. गयामध्ये शनिवारी रात्री एका तरुणाची गोळी मारून हत्या करण्यात आली आहे.
गया: बिहारमध्ये पुन्हा एकदा जंगल राजचा नमुना पाहायला मिळाला आहे. गयामध्ये शनिवारी रात्री एका तरुणाची गोळी मारून हत्या करण्यात आली आहे. जेडीयू आमदार मनोरमा देवी यांचा मुलगा रॉकीनं ही हत्या केल्याचा आरोप होत आहे. या तरुणानं रॉकीची गाडी लँड रोवरला ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न केला, त्यामुळे रॉकीनं त्याला गोळी मारल्याचं बोललं जात आहे.
आदित्य असं मृत्यू झालेल्या मुलाचं नाव आहे. बारावीत असलेला आदित्य गयामधल्या बड्या व्यापाऱ्याचा मुलगा होता. मित्राच्या बर्थडे पार्टीसाठी तो बोधगयाला गेला होता. तिथून परत येत असताना ही घटना घडली. या प्रकरणी पोलिसांनी मनोरमा देवींच्या घरातून गाडी जप्त केली असली तरी रॉकी मात्र फरार आहे.