जम्मू-काश्मीरमधील चकमकीत दोन दहशतवाद्यांना कंठस्नान, एक जवान शहीद
जम्मू-काश्मीरच्या बंदिपोरा जिल्ह्यात सुरक्षा रक्षक आणि दहशतवादी यांच्यातील चकमकीत दोन दहशतवादी ठार झालेत तर भारताचा एक जवान शहीद झालाय. अद्यापही या भागात चकमक सुरु आहे.
श्रीनगर : जम्मू-काश्मीरच्या बंदिपोरा जिल्ह्यात सुरक्षा रक्षक आणि दहशतवादी यांच्यातील चकमकीत दोन दहशतवादी ठार झालेत तर भारताचा एक जवान शहीद झालाय. अद्यापही या भागात चकमक सुरु आहे.
सोपोर आणि बंदिपोर जिल्ह्यात लष्कर आणि पोलीस यांनी दहशतवादविरोधी कारवाई सुरु केली होती. या कारवाईदरम्यान हे दोन दहशतवादी मारले गेले. भारताने केलेल्या सर्जिकल स्ट्राईकनंतर प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर तणावाचे वातावरण आहे.
मंगळवारी पाकिस्तानने केलेल्या गोळीबारात भारताचे तीन जवान शहीद झाले होते. त्यातील एका शहीद जवानाच्या पार्थिवाची विटंबना करण्यात आली. या घटनेनंतर भारताने पाकिस्तानला चोख प्रत्युत्तर दिले होते. सर्जिकल स्ट्राईकनंतर पाकिस्तानकडून मोठ्या प्रमाणात शस्त्रसंधीचे उल्लंघन करण्यात आलेय.