नवी दिल्ली : भारतीय रिजर्व बँकेसाठी रोख रक्कम घेऊन जाणारे 2 ट्रक रात्रभर भररस्त्यात उभे होते. यादरम्यान पोलीस आणि अधिकाऱ्यांचा श्वास अडकून बसला बसला होता. 


मंगळवारी रात्री 2 ट्रक रिजर्व बँकेतून रोख रक्कम घेऊन निघाले होते. पण काही तांत्रिक बिघाडीमुळे एक ट्रक भररस्त्यात बंद पडला. यानंतर दुसरा ट्रक देखील राजपथवर थांबवण्यात आला. हे ट्रक म्हैसूरवरुन तिरूवनंतपूरम येथे जात होते.
 
पोलीस अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार मुदैरवरुन कलपुर्जे येथे आल्यानंतर ट्रक दुरुस्त झाला आणि त्यानंतर बुधवारी दोन्ही ट्रक पुढे पाठवण्यात आले. या ट्रकमध्ये मोठी रक्कम होती. सीआरएफपीचं पथक देखील या दोन ट्रक सोबत होतं.