नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी मन की बात या कार्यक्रमातून जनतेशी आज संवाद साधणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी दर महिन्यात रविवारी मन की बात कार्यक्रमातून सरकारचे विविध उपक्रम आणि सुरू असलेल्या कामाविषयी माहिती देतात. तसेच ते या कार्यक्रमाच्या माध्यमातून नागरिकांकडून येणा-या सूचनांनाही प्राधान्य देतात.


आज पंतप्रधान कोणत्या विषयावर बोलणार याकडे जनतेचं लक्ष लागून राहीलंय. भाजपचे नेते प्रसाद लाड यांच्या पुढाकाराने आणि भाजप मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांच्या नेतृत्वाखाली हा कार्यक्रम मुंबईतील 120 ठिकाणी रेडिओच्या माध्यमातून लोकांना ऐकण्याची व्यवस्था केली जाणार आहे.