श्रीनगर : जम्मू काश्मीरमधील हिंसाचार आणि तणावाच्या पार्श्वभूमीवर 28 नेत्यांचं सर्वपक्षीय शिष्टमंडळ श्रीनगरला रवाना झालंय. बुरहान वाणी या दहशतवाद्याला ठार केल्यानंतर जम्मू काश्मीरमध्ये हिंसाचार पसरलाय.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

गेल्या 58 दिवसांपासून या परिसरात तणावपूर्ण वातावरण आहे. यावर तोडगा काढण्यासाठी सरकारनं पुढाकार घेत सर्वपक्षीय बैठक बोलावली.. या बैठकीत सर्वपक्षीय नेत्यांचं शिष्टमंडळ काश्मीरला पाठवण्याचा निर्णय घेण्यात आलाय. 


हे शिष्टमंडळ इथल्या परिस्थितीची पाहणी करणार आहे. या शिष्टमंडळाच्या भेटीनंतर काहीतरी समाधानकारक हाती लागेल असा विश्वास काँग्रेस नेते गुलाम नबी आझाद यांनी व्यक्त केलाय. तर दुर्दैवानं या गोष्टीसाठी बराच उशीर झाला असून दोन महिने आधीच हे व्हायला हवं होतं असं सीताराम येचुरी यांनी म्हटलंय. 


दरम्यान काश्मीर खो-यात पॅलेट गन्स वापरण्यात येणार नसल्याचं गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी स्पष्ट केलंय. त्याऐवजी पावा शेल्स वापरण्यात येणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलंय.