श्रीनगर : जम्मू-काश्मीरमधील माछिल सेक्टरमध्ये जवान आणि दहशवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीत तीन जवान शहीद झाले आहेत. एका जवानाच्या मृतदेहाची विटंबना केली गेली आहे. पाकिस्तानला या कृत्याची जबर किंमत मोजावी लागेल असा इशारा भारतीय लष्कराने दिला आहे.


पाकिस्तानने मागच्या महिन्यातही एक भारतीय जवानाच्या मृतदेहाची अशाच प्रकारे विटंबना केली होती. पाकिस्तानात पळत जात असतांना पाकिस्तानने फायरिंग करुनदहशतवाद्यांना मदत केली होती.