बांदीपुरा : जम्मू काश्मीरमधल्या गुरेज सेक्टर भागात झालेल्या हिमस्खलनात १५ जवान शहीद झाले आहेत. त्यामध्ये महाराष्ट्रातल्या ३ जवानांचा समावेश आहे. यामध्ये अकोला जिल्ह्यातले संजय खंदारे आणि आनंद गवई हे दोघे आणि बीडचे विकास समुद्रे असे तिघे शहीद झाले आहेत.  २६ जानेवारीला काश्मीरमध्ये गुरेज सेक्टर इथे बर्फाखाली गाडले जाऊन १५ जवान शहीद झाले. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सकाळी या जवांनाची शोध मोहीम सुरु झाल्यावर चार मृतदेह हाती लागलेत. तर एका जवानाला वाचवण्यात शोधपथकाला यश आलंय. बांदीपुरा जिल्ह्यातील नियंत्रण रेषेजवळ गुरेज सेक्टरमध्ये हिमपर्वताचा एक विशाल भाग लष्कराच्या शिबिरावर कोसळला. 


ही दुर्घटना घडल्यानंतर बचाव कार्य हाती घेण्यात आलं. दरम्यान हिमस्खलन झाले त्याच वेळी जवळून जाणारं लष्कराचं गस्ती पथकही दुर्घटनाग्रस्त झाले. हिमवर्षावाच्या पार्श्वभूमीवर जम्मू-काश्मीर प्रशासनाने काश्मीर खोऱ्यातील बर्फाळ क्षेत्रातील उंच ठिकाणांवर हिमस्खलन होण्याचा इशारा दिला आहे. या क्षेत्रांमध्ये तीन दिवसांपासून अधूनमधून हिमवर्षाव होत आहे.