चिमुरडीसमोरच आईवर गँगरेप, १४ दिवसांच्या बाळाला खाली फेकलं
उत्तरप्रदेशात एक हादरवून टाकणारी घटना घडलीय. एका महिलेवर तिच्या तीन वर्षांच्या चिमुरडीसमोरच बलात्कार करण्यात आलाय. इतक्यावरच हे हैवाण थांबले नाहीत तर त्यांनी चालत्या बसमधून या महिलेच्या १४ दिवसांच्या नवजात बालकाला खाली फेकून दिलंय... यात या बालकाचा मृत्यू झालाय.
बरेली : उत्तरप्रदेशात एक हादरवून टाकणारी घटना घडलीय. एका महिलेवर तिच्या तीन वर्षांच्या चिमुरडीसमोरच बलात्कार करण्यात आलाय. इतक्यावरच हे हैवाण थांबले नाहीत तर त्यांनी चालत्या बसमधून या महिलेच्या १४ दिवसांच्या नवजात बालकाला खाली फेकून दिलंय... यात या बालकाचा मृत्यू झालाय.
बुधवारी अत्यंत घृणास्पद अशी ही घटना घडलीय. बसमधून बाकीचे प्रवासी खाली उतरल्यानंतर बसचा ड्रायव्हर आणि कंडक्टरनं हे लाजिरवाणं कृत्य केलंय. इतर प्रवासी खाली उतरल्यानंतर या दोघांनी महिलेसोबत चाळे सुरु केले... तिनं प्रतिकार केला तेव्हा त्यांनी तिच्या तोंडात जबरदस्तीनं दारु ओतली.. आणि तिच्यावर सामूहिक बलात्कार केला.
बलात्कार करताना आरोपींनी महिलेच्या १४ दिवसांच्या नवजात बालकाला चालत्या बसमधून खाली फेकून दिलं. पीडित महिलेची प्रकृती चिंताजनक असून तिला काहीही आठवत नाहीय. ती रामपूरची रहिवासी आहे.
तीन वर्षांची चिमुरडी घाबरून सीटच्या मागे लपून बसल्यामुळे तिचा जीव वाचला... अन्यथा तिलाही ठार मारायला या हैवाणांनी मागे - पुढे पाहिलं नसतं. या चिमुरडीनं पोलिसांना आणि आपल्या वडिलांना घडलेली सगळी हकीगत सांगितलीय.
बेशुद्ध अवस्थेतील महिलेला आरोपींनी बसखाली उचलून रस्त्यावर टाकत असताना ही चिमुरडी हळूच बसमधून खाली उतरली. त्यामुळे, आरोपींची नजर तिच्यावर गेली नाही.
पोलिसांनी दोन्ही आरोपींना अटक केलीय. त्यांच्यावर कलम ३७६ डी (सामूहिक बलात्कार) आणि कलम ३०४ (हत्येचा प्रयत्न) नुसार गुन्हे दाखल करण्यात आलेत.