पणजी : ४७ व्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवास गोव्यात सुरुवात होणार आहे. पणजीतल्या श्यामाप्रसाद मुखर्जी सभागृहात ज्येष्ठ दिगदर्शक रमेश सिप्पी यांच्या हस्ते महोत्सवाचे थोड्याचं वेळात उदघाटन होणार आहे.


केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री व्यंकय्या नायडू, मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांच्यासह सिनेक्षेत्रातील मान्यवरांच्या उपस्थितीत या महोत्सवाचा उदघाटन सोहळा रंगणार आहे. पॉलिश दिग्दर्शक अँड्रेज वाजेद यांच्या आफ्टर इमेज या सिनेमाने 90 देशातील 300 सिनेमांचा पिटारा खोलला जाईल. यंदा इंडियन पॅनोरमा विभागात चार मराठी सिनेमे प्रदर्शित होतील.