नवी दिल्ली :  किंग्ज ऑफ गुड टाइम्स विजय माल्याला लंडनहून भारतात परत आणणे मोदी सरकारला खूप अवघड गोष्ट बनली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

त्याच्यावर ९ हजार कोटींचे बँकांचे कर्ज आहे. पण माल्यापेक्षा पाच उद्योगपती कर्ज घेण्याच्या बाबतीत खूप पुढे आहेत. 


या उद्योगपतींचे तुम्ही नावं ऐकले तर तुम्हांला धक्का बसेल.


१) अनिल अंबानी 


अनिल अंबानीच्या रिलायन्स एडीएजी वर १.१३ लाख कोटींचे कर्ज आहे. कंपनीच्या मार्च २०१५ च्या बॅलेन्सशीटवर नजर टाकली तर त्यांना १.२५ कोटींचा तोटा झाला आहे. 


२) अनिल अग्रवाल 


अनिल अग्रवाल यांची वेदांता कंपनीवर ९० हजार कोटी रुपयांचे कर्ज आहे.  कंपनीला दरवर्षी १० हजार कोटीचे कर्ज फेडायचे आहेत. 


३) जे पी गौड


जेपी एसोसिएट्सवर एकूण ८५ हजार कोटी रुपयांचे कर्ज आहे. ही कंपनी सिमेंट, पॉवर आणि रिअल स्टेटसह अनेक बिझनेसमध्ये आहे. 


४) गौतम अदानी


अदानी कंपनीवर ७२ हजार ६३२ कोटी कर्ज आहे. 


५) सज्जन जिंदल 


जिंदलच्या जेएसडब्ल्यू कंपनीवर ५८ हजार कोटीचे कर्ज आहे.