बेडरूममधील भयाण चित्र पाहून बेशुद्ध झाली वहिनी...
भंगारचे व्यापारी मो. मुहर्रम यांच्या फॅमिलीतील 5 जणांची धारदार शस्त्राने वार करून निर्घृण हत्या केल्याची घटना अलाहबाद घडली आहे. मुहर्रम यांची पत्नी गंभीर जखमी असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. ही घटना रविवार सकाळी उघडकीस आली.
अलाहबाद : भंगारचे व्यापारी मो. मुहर्रम यांच्या फॅमिलीतील 5 जणांची धारदार शस्त्राने वार करून निर्घृण हत्या केल्याची घटना अलाहबाद घडली आहे. मुहर्रम यांची पत्नी गंभीर जखमी असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. ही घटना रविवार सकाळी उघडकीस आली.
सकाळी झाली तरी अजून कोणी कसे उठले नाही, हे पाहाण्यासाठी मुहर्रम यांची वहिनी त्यांच्याकडे आली. बेडरुममध्ये पाहाते तर काय तिला पाच मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात पडलेले दिसले. ते पाहून ती ओरडतच बाहेर आली. सगळ्यांना ठार मारले, असे म्हणत ती बेशुद्ध झाली.
नेमकं काय घडलं...
भंगारचे व्यवसाय करणारे मो. मुहर्रम यांच्या फॅमिलीत ही घटना घडली आहे. रविवारी सकाळी उशीर झाला तरी अजून सगळे कसे उठले नाही, हे पाण्यासाठी मुहर्रम यांच्या भावाची पत्नी बेडरुमकडे गेली. बेडरुममध्ये पाच जणांचे मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात पडलेले पाहून ती ओरडतच बाहेर आली.
या प्रकारात जखमी महिलेवर शासकीय हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु आहे. तिची प्रकृती चिंताजनक आहे.
या हत्याकांडात मुहर्रम (४०), शुभम (१७), नंदनी (१६), छोटू (१३), बल्लू (१०) अशी मृत व्यक्ती नावे असून दिद्दिया (३५) या गंभीर जखमी आहेत.
का घडले हे हत्याकांड...
हे हत्याकांड प्रॉपर्टीच्या वादातून झाल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. या प्रकरणी दोन संशयीतांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. जखमी दिद्दिया यांचा जबाब नोंदवल्यानंतरच तपासकार्याला दिशा मिळेल, असे पोलिसांनी म्हटले आहे.