नवी दिल्ली : सरकारने आवाहन केलं आहे की, हजार, पाचशेच्या नोटा बँकेत जमा करा, यासाठी ५० दिवसांचा वेळ दिला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या काळात अडीच लाखापेक्षा अधिक रोख रक्कम जमा करण्यात आली, आणि इनकम टॅक्समध्ये विसंगती दिसली तर २०० टक्के दंड भरावा लागणार आहे


'१० नोव्हेंबर ते ३० डिसेंबर २०१६' दरम्यान कोणत्याही खात्यात २.५० लाख पेक्षा जास्त पैसे जमा झाले, तर त्याची माहिती आयकर विभागाला मिळणार आहे.


यानंतर आयकर विभाग जमा झालेल्या रकमेचा हिशेबाचा ताळमेळ आयकर रिटर्नसोबत बसतो का? हे तपासून पाहणार आहे.


खातेधारकाने घोषित केलेलं उत्पन्न आणि जमाखर्चाची विसंगती समोर आली तर ती कर चोरी समजली जाणार आहे.


मात्र यात लहान व्यापारी, गृहिणी, कलाकार, कामगार, शेतकरी यांना चिंता करण्याची गरज नाही, ज्यांनी २ लाखाच्या आत काही रोख पैसे घरात वाचवून ठेवले असतील, अशा लोकांना चिंता करण्याची गरज नाही.


या दरम्यान सोनं खरेदी करतील अशा लोकांना पॅनकार्ड नंबर द्यावा लागणार आहे.