शिमला : हिमाचल प्रदेशातील चंबा जिल्ह्यात एक भयंकर अपघात पाहायला मिळालाय. या अपघातात बोलेरो गाडी तब्बल ३०० मीटर खोल दरीत कोसळली. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

यामध्ये प्रवास करत असलेल्या सहा जणांचा जागीच मृत्यू झाला तर ४ जण गंभीर जखमी झालेत. 


ही गाडी कांगडाहून मणिमहेशकडे जात होती. ड्रायव्हरला अंदाजा न आल्यानं ही गाडी बाजुच्या ३०० मीटर खोल दरीत कोसळली. 


स्थानिकांनी पोलिसांना सूचना दिल्यानंतर अॅम्बुलन्स मागवण्यात आली. त्यानंतर स्थानिकांच्या मदतीनं यातील जखमींना बाहेर काढण्यात आलं. त्यांच्यावर चंबा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.