नवी दिल्ली : भारताला दहशतवादाच्या या समस्येपासून लढण्यासाठी सैन्याचा वापर केला पाहिजे असं देशातल्या अनेकांचं मत आहे. नुकताच झालेल्या प्यू रिसर्च सेंटरच्या सर्वेक्षणात किती टक्के लोकांचं मत हे दहशतवादाच्या विरोधात लष्काराचा वापर करावा असं आहे हे समोर आलं आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

देशातील 60 टक्के लोकांचं असं मत आहे की, लष्कराचा वापर करुन ही समस्या दूर करावी. केंद्र सरकारच्या पाकिस्तान नीतीवर अनेकांनी नाराजी दर्शवली आहे. 22 टक्के लोकं फक्त या नीतीच्या बाजूने आहेत.


52 टक्के लोकांना यांची चिंता आहे की, आयसीस सारखी दहशतवादी संघटना देशासाठी धोकादायक आहे. जगभरात दहशतवाद्यांशी लढण्यासाठी लष्कर हा सर्वात श्रेष्ठ मार्ग आहे. पण 22 टक्के लोकांचं मत आहे की यामुळे द्वेष आणखी वाढेल.


भारत हा जगभरात महत्त्वाची भूमिका बजावत आहे. पठ्ठानकोटमध्ये झालेल्या हल्ल्यानंतर हा सर्वे करण्यात आला होता. 63 टक्के लोकांचं म्हणणं आहे की, देशाच्या सुरक्षेवरचा खर्च वाढवला पाहिजे. तर 6 टक्के लोकांचं म्हणणं आहे की खर्च कमी केला पाहिजे.