नवी दिल्ली : छत्तीसगड जिल्ह्यातील दंडेवाडामध्ये सीआरपीएफ जवानांवर झालेल्या हल्यात नवा खुलासा झालाय. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मिळालेल्या माहितीनुसार, सुरुंगाच्या स्फोटात जखमी झालेल्या एका सीआरपीएफ सहकाऱ्याचा जीव वाचवण्यासाठी इतर जवान निघाले होते. हा सहकारी म्हणजे एखादा जवान नाही तर 'कुत्रा' होता. याच दरम्यान हे जवान दुसऱ्या एका सुरुंगाच्या भक्ष्यस्थानी पडले.


बेल्जियन मॅलिनॉईस जातीचा स्निफर डॉग 'स्काऊट' हा काही दिवसांपासून आजारी होता. सीआरपीएफचा या कुत्र्याला डिहायड्रेशनचा त्रास जाणवत होता. त्याला लवकरात लवकर दवाखान्यात हलवणं गरजेचं होतं. त्यासाठी हे जवान कुत्र्याला घेऊन निघाले होते. 


याच कुत्र्यानं याआधी अनेक छुप्या सुरुंगांचा मार्ग काढत अनेक जवानांचे प्राण वाचवले होते. 


नक्षली हल्ल्याची शक्यता होती यामुळे त्यांनी साधा वेषही परिधान केला होता. शिवाय, सीआरपीएफची गाडी न घेता एका टेम्पोतून ते हॉस्पीटलला निघाले होते. परंतु, हाच त्यांचा निर्णय चुकला आणि नक्षलवाद्यांनी जवळपास ५० किलो विस्फोटकांचा वापर करून टेम्पो उडवून दिला. बुधवारी ही घटना घडली होती.