आयसीसच्या संपर्कात असलेले ७५ संशयित ताब्यात
![आयसीसच्या संपर्कात असलेले ७५ संशयित ताब्यात आयसीसच्या संपर्कात असलेले ७५ संशयित ताब्यात](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/styles/zm_500x286/public/2017/03/16/220321-385144-isis1.jpg?itok=2K14VnlT)
एनआयएने आयसीसच्या संपर्कात असलेल्या ७५ संशयितांना ताब्यात घेतलं आहे. गृह राज्यमंत्री हंसराज अहीर यांनी बुधवारी राज्यसभेत एका लिखित प्रश्नाला उत्तर देतांना ही माहिती दिली.
नवी दिल्ली : एनआयएने आयसीसच्या संपर्कात असलेल्या ७५ संशयितांना ताब्यात घेतलं आहे. गृह राज्यमंत्री हंसराज अहीर यांनी बुधवारी राज्यसभेत एका लिखित प्रश्नाला उत्तर देतांना ही माहिती दिली.
हंसराज अहीर यांनी सांगितलं की, आयसीसशी संबधित केरळमधून २१, तेलंगणामधून १६, कर्नाटकातून ९, महाराष्ट्रातून ८, मध्यप्रदेशमधून ६ उत्तराखंड आणि तमिळनाडूमधून प्रत्येकी ४-४, उत्तर प्रदेशमधून ३, राजस्थानमधून १, पंश्चिम बंगाल आणि जम्मू-कश्मीरमधून प्रत्येकी १-१ संशयिताला ताब्यात घेतलं आहे.
हंसराज अहीर यांनी माहिती दिली की, जम्मू-कश्मीरच्या काही युवकांनी आयसीसचे झेंडे फिरकावले. कायदा-सुव्यवस्था सांभाळण्याचं काम राज्य सरकारचं आहे त्यामुळे त्यांना यासंबंधित कारवाई करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. संरक्षण विभागाच्या रिपोर्टनुसार या संघटनेशी संबंधित शिक्षित युवक देखील सोशल मीडियाच्या माध्यमातून आयसीसशी संपर्क करत आहेत.