रायपूर : छत्तीसगड आणि तेलंगणाच्या सीमेवर पोलीस चकमकीत ८ नक्षलवादी ठार झालेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

हे नक्षलवादी छत्तीसगड येथून खम्ममच्या दिशेने जात होते याची माहिती मिळाली. त्यानंतर पोलिसांनी सापळा रचून त्यांना घेरले. त्यावेळी नक्षलवाद्‌यांनी जोरदार गोळीबार करताच पोलिसांनीही त्यांना चोख प्रत्युत्तर दिले. यावेळी ८ नक्षलवादी ठार झाले. 


दरम्यान नक्षलवादी आणि पोलिसांमध्ये चकमक सुरू असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे किती नक्षली आहेत, हे समजू शकलेले नाही. मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे.