श्रीनगर : जम्मूतील उधमपूर जिल्ह्यात देशातील सर्वात मोठा ९ किलोमीटर लांबीचा बोगदा तयार करण्यात आला आहे. या बोगद्यामुळे जम्मू-श्रीनगर यांच्यातील अंतर ३२ किमीने कमी होणार आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

टनीटॉपमध्ये हिमवृष्टीमुळे काश्मीरचा देशाशी संपर्क तुटतो. आता हा बोगदा वाहतूकीसाठी सुरु झाल्यास असं होणार नाही. हा बोगदा २०११ मध्ये बनवण्यासाठी सुरु झाला होता. जो २०१६ मध्ये पूर्ण झाला.


जम्मू ते श्रीनगरला जाणाऱ्या गाड्य़ांना पटनीटॉप वरुन जावं लागत होतं. पण आता हा बोगदा तयार झाल्यामुळे ४१ किमीचा हा रस्ता ९ किमीमध्ये गाठता येणार आहे. या बोगद्यामध्ये आणखी एक वेगळा बोगदा आहे. कोणत्याही आपातकालीन स्थितीत त्याचा वापर केला जाणार आहे.