रायपूर : एखाद्या प्राण्यावर गुन्हा दाखल करुन त्याला कारावासाची शिक्षा दिली असे तुम्हाला सांगितले तर खरे वाटेल का? पण, अशी घटना प्रत्यक्षात घडलीय.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

छत्तीसगड राज्यातील कोरिआ जिल्ह्यात ही घटना घडलीय. इथं चक्क एका बकरीला पोलिसांनी अटक करुन त्याच्यावर खटला चालवल्याची घटना पुढे आलीय.


बकरी आणि तिच्या मालकावर ताकीद देऊन एकच गुन्हा पुनः पुन्हा करण्याच्या आरोपाखाली अटक केली आहे. या गुन्ह्यासाठी त्यांना सात वर्षांच्या कारावासाची शिक्षा होऊ शकते. खटल्यासाठी बकरी आणि तिच्या मालकाला कोर्टात आणले असता त्यांना जामीन मंजूर करण्यात आला आहे.


जिल्हा न्यायाधीशांच्या बंगल्याच्या आवारात दररोज झुडुपांची पाने, फळे, भाज्या आणि फुले खाणे या आरोपाखाली बंगल्याचे माळीकाम करणाऱ्या व्यक्तीने याविषयी लेखी स्वरुपात तक्रार दाखल केली होती. आता या बकऱ्याचा जवाब कसा नोंदवणार, हा एक मोठा प्रश्न आहे.