भोपाळ : मध्यप्रदेशची राजधानीला लागून असलेल्या एका गावात एक आश्चर्यकारक घटना उघडकीस आलीय. विवाहानंतर केवळ १० दिवसांत एका महिलेनं एका बाळाला जन्म दिलाय. यामुळे, तिचे सासरच्या मंडळींनाही धक्का बसला.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

यानंतर महिलेनं दिलेल्या माहितीनुसार, लग्नापूर्वी ती बलात्काराची शिकार ठरलेली आहे. मुलीच्या आई-वडिलांचा अगोदरच मृत्यू झालेला आहे. लग्नापूर्वी आरोपीनं - काशीराम सिलावत यानं अनेकदा तिच्यावर बळजबरी केलेली आहे, असं या महिलेनं पोलिसांसमोर म्हटलंय. 


या महिलेच्या सासरच्या मंडळींनी महिलेचा आणि तिच्या बाळाचा स्वीकार करायचं ठरवलंय. परंतु, लग्नापूर्वी महिला गर्भवती होती हे आपल्या लक्षात आलं नसल्याचं त्यांनी म्हटलंय. 


पोलिसांच्या म्हणण्यानुसार, आरोपीवर बलात्काराची तक्रार नोंदवून घेण्यात आलीय. परंतु, बाळाची डीएनए टेस्ट केल्यानंतरच प्रकरणाचा सोक्षमोक्ष लागू शकेल, असं त्यांचं म्हणणं आहे. महिलेचा तिच्या पतीसोबत वर्षभरापूर्वीच साखरपुडा झाला होता. तोदेखील तिच्या घरी अनेकदा जात असे... त्यामुळे डीएनए रिपोर्टनंतरच कारवाई केली जाईल, असं पोलिसांनी म्हटलंय.