नवी दिल्ली : एकाच नावाने अनेक ड्रायविंग लायसेंस बनवण्यावर आता बंदी घालण्यासाठी केंद्र सरकारने राज्य सरकारला आधार कार्ड लिंक करणं अनिवार्य केलं आहे. नव्या ड्रायविंग लायसेंस बनवण्यासाठी किंवा जुनं रिनिव्ह करण्यासाठी आधार कार्ड देणं आता आवश्यक असणार आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

ट्रॅफिक नियमांचं उल्लंघन केल्यानंतर अनेकांची ड्रायविंग लाइसेंस रद्द करण्यात आली होती पण अनेकांनी पुन्हा नवीन लायसेन्स काढल्याच्या घटना समोर आल्या होत्या. अशा प्रकारे चुकीच्या पद्धतीने लायसन्स बनवण्याचा प्रकार समोर आला.


रस्ते परिवहन मंत्रालयाने ड्रायविंग लायसेंससाठी आता आधार कार्ड आवश्यक केलं आहे. यावर काम सुरु देखील झालं आहे. ड्रायविंग लायसेंस हे राज्य पुरवतं त्यामुळे केंद्र सरकार राज्यांना हे 'सेफ सिस्टम' स्विकारण्यासाठी विनंती करेल. वेगवेगळ्या राज्यातून अनेक ड्रायविंग लायसेंस बनवण्याची प्रथा लवकरच संपणार आहे.


सध्या एकापेक्षा अधिक ड्रायविंग लाइसेंस बनवणं कठीण नाही आहे. पोलिसांनी ड्रायविंग लायसेंस जब्त करणं देखील ट्रॅफिक नियमांचं उल्लंघन करणाऱ्यांवर अंकुश नाही ठेवू शकलं.