नवी दिल्ली : देशाच्या नागरिकांना त्यांच्या स्वतःच्या शरीरावर परिपूर्ण अधिकार नाही, असं देशाचे अटर्नी जनरल मुकुल रोहतगी यांनी सर्वोच्च न्यायालयात म्हटले आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आधार क्रमांक पॅनशी जोडण्याविषयी सरकारने केलल्या सक्तीला आव्हान देणारी याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आली. त्यावर सरकारची बाजू मांडताना मुकुल रोहतगी यांनी केलेल्या युक्तीवाद हे विधान केले आहे.


कोणत्याही नागरिकाचा त्याच्या शरीरावर संपूर्ण हक्क नाही, असा हक्क असता तर आत्महत्या विरोधी कायदा, गर्भपातविरोधी कायदा घटनाबाह्य ठरला असता असा युक्तीवाद अटर्नी जनरल यांनी केलाय. त्यामुळे कुठलाही नागरिक डोळ्याच्या पडद्याचे किंवा हाताच्या बोटांचे ठसे नाकारू शकत नाही, असंही रोहतगी यांनी कोर्टाला सांगितले आहे.