आग्रा : देशात भ्रष्टाचार आणि गैरव्यवहार कोणत्या पातळीला पोहोचलाय याचा प्रत्यय नुकताच उत्तर प्रदेशात आला. आजपासून उत्तर प्रदेशात राज्य बोर्डाच्या दहावीच्या परीक्षा सुरू होत आहेत. आग्र्यातील एका महाविद्यालयाने चक्क क्रिकेटर सचिन तेंडुलकरचा मुलगा अर्जुन तेंडुलकर याच्या फोटोसकट हॉलतिकीट दिलं आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

केवळ आग्रा शहरातून १.६ लाख विद्यार्थी या परिक्षेला बसणार आहेत. आग्रा शहरातील अंकुर इंटर कॉलेजमध्ये हा प्रकार घडला आहे. ००२५४८८ या नंबरचं हे हॉल तिकीट आहे. या हॉलतिकीटावर अर्जुनचा फोटो असला तरी नाव मात्र 'अर्जुन सिंग' आहे. हे हॉल तिकीट कॉलेज प्रशासनाकडून स्टँप लावून अटेस्टही केले गेले आहे.


उत्तर प्रदेशमध्ये मोठ्या प्रमाणात कॉपी आणि डमी करणाऱ्यांची रॅकेट्स परिक्षांच्या काळात चालतात. अगदी काही हजार रुपयांच्या मोबदल्यात खोटी ओळखपत्रे जारी केली जातात, हे आता सर्वांनाच माहिती आहे. 


अनेक वेळा तपास करुन, धाडी टाकूनही या माफियांच्या कारनाम्यांत काही कमी आलेली नाही. पण, आता मात्र चक्क सचिन तेंडुलकरच्या मुलाचाच फोटो ओळखपत्रावर लावल्याचे समोर आल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे.